मानोरा:-- बंजारा समाजासह हिंदी, सिंधी, गुजराती, तेलगू या राज्यातील भाषिक समूहासाठी राज्य शासनाने राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या साहित्य अकादमी वरील सर्व अशासकीय सदस्यांच्या नेमणुका एका पत्राद्वारे आज रद्द केल्याने गोर बंजारा साहित्य अकादमी सह उपरोक्त सर्व साहित्य अकादमी यांचे वय केवळ काही महिने ठरल्याने राज्य शासनाच्या धोरणाविषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
गोर बंजारा भाषा, कला, साहित्य व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करणे परिसंवाद चर्चासत्रे कवी संमेलने साहित्यिक सांस्कृतिक लोककलांची संमेलने आयोजित करणे गोर बंजारा साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देणे, गोर बंजारा वांग्मयीन कृती प्रकाशित करण्यास आर्थिक सहाय्य करणे इत्यादी उपक्रम राबविण्यासाठी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना केली होती.
गोरबंजारा साहित्य अकादमी वर साहित्यिक फुलसिंग जाधव यांना कार्याध्यक्ष नेमून राज्याच्या विविध भागातील दहा व्यक्तींची सदस्य म्हणून नेमणूक केली होती ज्यांची नियुक्ती राज्याच्या सांस्कृतिक विभागा द्वारा घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आज रद्द केल्याचे पत्र सहसंचालक तथा सदस्य सचिव गोरबंजारा साहित्य अकादमी सर्व निंबाळकर यांच्या सहीनिशी निर्गमित करण्यात आल्याने उपरोक्त कार्यकारणी तथा बंजारा समाज बांधवांकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत.
##
*कोणतीही आर्थिक तरतूद केल्याशिवाय भविष्यात साहित्य अकादमीवर नवीन अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करू नयेत. निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही आर्थिक तरतूद न करता घाई घाईने अस्तित्वात आणलेल्या विविध समाजाच्या साहित्य अकादमी एक घोर फसवणूक होती हे आता सिद्ध झालेले आहे. यापुढे कोणत्याही समाजाची अशी फसवणूक होऊ नये ही राज्य सरकारकडून अपेक्षा आहे मागील सहा महिन्यात संबंधित मंत्री महोदयांनी एकही बैठक घेतली नाही हे एक विक्रम ठरावे अशा जळजळीत प्रतिक्रिया पदमुक्त कार्याध्यक्ष फुलसिंग जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ दिल्या.*
No comments:
Post a Comment