वाशिम,दि.१३ एप्रिल (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) नागरिकांना सुकर सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाशी संबंधीत तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक
महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. सोमवारी सुट्टी असल्यास पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे. लोकशाही दिनादरम्यान इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी जाणुन घेतल्या जातील आणि त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल.असे दीपा हेरोळे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment