Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, April 29, 2025

परिसर स्वच्छतेचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागरिकांना संदेश गांव,बस्ती चलो अभियानाचा तालुक्यात शुभारंभ


मानोरा- शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी भारतीय जनता पक्ष शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वतः हातात झाडू घेऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता करून स्वतःपासून स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने शहर व तालुक्यातील सामान्य नागरिकांनी सुद्धा यापुढे परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन या अभियाना अंतर्गत करण्यात आले आहे.
 भारतीय जनता पार्टीने ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे गांव चलो, बस्ती चलो अभियान राबविण्यात आले. यावेळेस कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचा परिसर झाडून स्वच्छ केला. पाण्याची टाकी  स्वच्छ केली तसेच नगरपंचायत मानोरा येथील सफाई कर्मचारी सोबत घेऊन संडास बाथरूम स्वच्छ केले. सदर अभियानात मानोरा तालुका भाजपा अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले ,महादेव ठाकरे,  राजेंद्र देशमुख, डॉ. सुहास देशमुख, डॉ भास्कर धामणीकर,प्रवीण धोटे, मनोज खडसे, दिगंबर लोंढे,विजय जैस्वाल, गोवर्धन पाटील, जगदीश राठोड, प्रफुल सोनटक्के, ज्ञानेश्वर देशमुख किरण सडतकर मंगेश पवार यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर