Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, May 1, 2025

पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे आगामी काळातील कामही सहकार्यांना प्रेरणा देणारेच असावे* _मुख्य अभियंता श्री.ज्ञानेश कुलकर्णी_>. परिमंडळातील ४९ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा "गुणवंत कामगार" म्हणून सन्मान


यवतमाळ,दि.२ मे २०२५(साप्ता. दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
          महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त विजेसारखी अत्यावश्यक सेवा देतांना अपघात विरहीत सेवा, ग्राहक समाधान,वसुली अश्या विविध निकषावर खरे उतरलेल्या परिमंडळातील ४९ तांत्रिक कर्मचाऱ्यांना " गुणवंत कामगार " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्राहक समाधान हे महावितरणचे ब्रिद् वाक्य आहे. त्यामुळे पुरस्कारप्राप्त  कर्मचाऱ्यांचे आगामी काळातील कामही सहकार्यांना प्रेरणा देणारे असेल  आणि इतर कर्मचारी त्या कामाचे अनुकरण करतील असे आवाहन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले.

           महावितरणमध्ये महाराष्ट्र दिन कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विद्युत भवन येथे ध्वजारोहण झाल्यानंतर महावितरणचे विभागीय प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित "गुणवंत कामगार" पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख,कार्यकारी अभियंता प्रशासन प्रदिप पुनसे,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे,कार्यकारी अभियंते अनिरूध्द आलेगावकर,संजय सराटे,राजेश माहुलकर,उपविधी अधिकारी प्रशांत लहाने,अतीरिक्त कार्यकारी अभियंता राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
       
         यावेळी बोलतांना मुख्य अभियंता म्हणाले की,अत्यावश सेवा क्षेत्रात काम करतांना कर्मचाऱ्यांनी ग्राहकाप्रती संवेदनशिल असणे गरजेचे आहे. महावितरणच्या तांत्रिक अडचणी निश्चितच आहे,परंतू ग्राहकांचे कॉल घेत त्यांच्याशी सौजन्याने वागा,त्यांना वास्ताविकता सांगितली तरी ग्राहकांचे समाधान होते.महावितरणचे काम हे ऑन ड्यूटी २४ तासाचे आणि अत्यंत धोक्याचे आहे. एक चुकही शेवटची ठरू शकते, कोणत्याही संस्थेतिल कर्मचाऱ्यांची तत्काळ रिप्लेसमेंट होते,परंतू कुटूंबातील मानसाची रिप्लेसमेंट होत नाही.याची जाणीव ठेवा आणि जबाबदारीने काम करा,तीन अर्थींग रॉडचा कायम वापर करा असे भावनिक आवाहन यावेळी त्यांनी केले.

       महावितरणची वाटचाल ऑटोमेशनकडे होत आहे.त्यादृष्टीने तांत्रिक तसेच मानव संसाधनाच्या पुन:र्र्चनाचे काम महावितरणने हाती घेतले आहे.स्मार्ट मिटर हा या बदलाचाच एक प्रकार आहे.त्यामुळे ग्राहकांचा स्मार्ट मिटरविषयी असलेला संभ्रम दुर करा.स्मार्ट मीटर हे टिवोडी मिटर आहे हे ग्राहकांना सांगा,तसेच हे प्रीपेड मिटर नाही, मिटरमुळे ग्राहकांना अचूक बिल तर मिळेलच शिवाय त्यांच्या वीजबिलाशी संबंधित तक्रारी ह्या संपूष्टात येणार आहे,तसेच मानव हस्तक्षेपाला या मीटरमध्ये स्थान नसल्याने वीज चोरीला आळा बसेल आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल याबाबत ग्राहकांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
     
          परिमंडळातील ४९ पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील २७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.त्यामध्ये प्रत्येक उपविभागातील एक तंत्रज्ञ असे २३ तंत्रज्ञ आणि प्रत्येक विभागातून एक यंत्रचालक अश्याप्रकारे ४ यंत्रचालक. यवतमाळ जिल्ह्यातील गुणवंत पुरस्काराने सन्मानित २२ कर्मचाऱ्यांमध्ये १८ तंत्रज्ञ आणि चार यंत्रचालकाचा समावेश आहे.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले आणि सुत्रसंचालन आणि आभार प्रविण वाट यांनी मानले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर