Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 10, 2025

व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत नासीर मिर्जा, जुनेद शेख जिल्हास्तरावर सन्मानित!

दिग्रस : 
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विषय निहाय व वर्ग निहाय व्हिडिओ तयार करायचे होते. तालुका तसेच जिल्हास्तरासाठी आयोजित या स्पर्धेत दिग्रस तालुक्यात कार्यरत नासीर मिर्जा आणि जुनेद शेख यांनी तालुका आणि जिल्हास्तरावर रोख पारितोषिक आणि बक्षिसे पटकावली आहेत.
शिक्षकांनी अध्ययन अध्यापन करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांचे शिकणे सोपे करण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने केले होते. यात विषय निहाय, वर्ग निहाय मनोरंजक आणि दर्जेदार व्हिडिओ तयार करुन ते ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करायचे होते. यात दिग्रस पंचायत समिती मधील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत मिर्जा नासिर बेग कलगाव, अमीन नौरंगाबादे कलगाव, आरती गुंडवार सिंगद यांनी क्रमांक पटकावले. तर येथील गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेत कार्यरत विज्ञान शिक्षक जुनेद बशीर शेख यांनी, तर खाजगी अनुदानित अल खुर्शीद या उर्दू शाळेचे अफरोज खान अफजल खान यांनी बक्षीस मिळवले आहे. दिग्रसचे रहिवासी आणि नगर परिषद आर्णी येथे कार्यरत प्राथमिक शिक्षक फारुक मलिक हे सुद्धा बक्षीसास पात्र ठरले आहेत. या सर्व शिक्षकांचा नुकताच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयश्री राऊत (शिक्षणाधिकारी माध्यमिक), डॉ. रमेश राऊत (वरिष्ठ अधिव्याख्याता), डॉ. किरण रापतवार (अधिव्याख्याता), धम्मरत्न वायवळ (अधिव्याख्याता), मधुमती सांगळे (अधिव्याख्याता), इकबाल शेख (गटशिक्षणाधिकारी आर्णी) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा डॉ. देवानंद सावरकर यांनी तर संचलन विषय साधनव्यक्ती शुभांगी वानखडे यांनी केले. तर धम्मरत्न वायवळ यांनी आभार मानले. रितेश लिचडे (विषय सहाय्यक आय.टी.सी.), अभय सावंकर, कु. सुलोचना राऊत, कु.माधुरी शिंदे, मनवर मॅडम, माहूरे सर, पवार सर, सोमकुंवर सर या सर्व साधनव्यक्तींनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. विजेत्या शिक्षकांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

चौकट : 
यवतमाळ जिल्ह्यातील शंभर शिक्षकांना वर्ग आणि विषयानुसार रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. जिल्हास्तर 48 आणि तालुकास्तर 124 अशा 172 पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले. अशा प्रकाराची ही पहिलीच स्पर्धा सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांना प्रोत्साहन देऊन तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा हा उद्देश समोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात आल्याचे यवतमाळ डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी सांगितले. या व्हिडीओचा मुलांसाठी अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन करतांनाच दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित केल्यास शिक्षकांकडून आणखी दर्जेदार व्हिडिओ तयार केले जातील आणि ते राज्यातील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांना उपयोगी पडतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

फॉलोअर