वाशिम,दि.९ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामार्फत डेटा व डिजिटल सेवा वापरून योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद व परिणामकारक पद्धतीने पोहोचवण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचा जमिनीचा ७/१२ उतारा, गाव नकाशे, आधार संलग्न माहिती आणि भू-संदर्भीय माहिती शेतकरी ओळख क्रमांक (Far शी जोडली जाणार आहे. त्यामुळे शेतजमिनीची अद्ययावत माहिती डिजिटाइज स्वरूपात तात्काळ उपलब्ध होणार आहे.
या सुविधेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीकविमा योजना, बाजारभाव माहिती, किमान आधारभूत किंमतीवरील खरेदीसाठी नोंदणी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे.
१५ एप्रिल २०२५ पासून ‘फार्मर आयडी’ अनिवार्य
या अनुषंगाने १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य करण्यात आला आहे.
त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंनी १३ मे २०२५ पूर्वी आपल्या नजीकच्या सामायिक सेवा केंद्र येथे जाऊन आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक व शेतीचा ७/१२ व ८-अ घेऊन 'फार्मर आयडी' तयार करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment