Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 17, 2025

भुईमूग वाहून गेलेल्या शेतकऱ्याला बाजार समितीकडून अखेर मदत देण्याची पाळी* *बाजार समितीत कृषी माल ठेवण्याला जागा नसल्याने झाले होते शेतकऱ्याचे नुकसान


मानोरा:-- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या भुईमूग हे कृषीमाल अकस्मात आलेल्या अवकाळी पावसाने वाहून गेल्याने हतबल व नुकसानग्रस्त झालेल्या कृषकाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला यासंदर्भात  मागील दोन दिवसांपासून शेतकरी गौरव पवार यांची बाजू वृत्तपत्रांनी उचलून धरली होती.
 बोरव्हा या गावचे युवा शेतकरी गौरव पवार यांनी आपल्या चार एकर शेत शिवारात पिकविलेली उन्हाळी भुईमूग विक्रीसाठी १५ तारखेला बाजार समिती परिसरामध्ये आणली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या आवारामध्ये जागा नसल्याने शेतकरी पवार यांनी आपली भुईमूग बाजार समिती परिसरात उघड्यावर ठेवली होती दरम्यान याचवेळी अवकाळीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पवार याची भुईमूग सगळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याने पवार यांना जबर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
पर्याय नसल्याने उघड्यावर भुईमुगाचा साठा केल्याने त्यांना त्यांच्या भुईमुगाला अपेक्षित दर सुद्धा व्यापाऱ्यांकडून न मिळाल्याचा दुहेरी मार शेतकरी पवार यांना सहन करावा लागला होता ज्याची दखल जिल्ह्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी  घेतली होती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेजाबाबदार धोरणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची गरज प्रतिपादन करणारे वृत्त सुद्धा प्रसिद्ध केले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या हस्ते आज नुकसानग्रस्त शेतकरी पवार यांना २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळी बाजार समितीचे उपसभापती व इतर संचालक सुद्धा हजर होते.


No comments:

Post a Comment

फॉलोअर