Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, May 20, 2025

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणारे 'कृषि संकल्प अभियान' २९ मे ते १२ जूनदरम्यान आयोजन


वाशिम,दि.२० मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) भारतीय कृषि संशोधन परीषद नवी दिल्ली व्दारे विकसित कृषि संकल्प अभियान दि. २९ मे ते १२ जुन २०२५ या कालावधीत देशभरात राबविणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. सदर अभियानामध्ये १ ते १.५ कोटी शेतक-यांशी थेट संवाद साधण्यात येणार असुन या अभियानाचे उदष्ट खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, विविध सरकारी योजना व धोरणांविषयी शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, पिकांची निवड, मृदा आरोग्य पत्रिकांची माहिती, नैसर्गिक शेती व संतुलित खतांचा वापर यावर मार्गदर्शन होणार आहे. या व्यतीरीक्त संशोधन केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने शेतक-यांच्या बांधावर पोहचविणार आहेत.

या अभियानासाठी भारतीय कृषि अनुसंधान परीषदेच्या अधिनिस्त राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि विदयापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील तसेच आत्मा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा चमु वाशिम जिल्हयातील गावांची निवड करुन कृषि जागृकता रथाव्दारे शेतक-यांना मार्गदर्शन कराणार आहेत.

वाशिम जिल्हयात दोन टिम तयार करण्यात आल्या असुन प्रत्येक टिम दिवसातुन तीन बैठका सकाळी ८ वा. १० वा. व संध्याकाळी ६ वाजता दररोज एका तालुक्यातील तीन गावामध्ये कृषि जागृकता रथा व्दारे मार्गदर्शन शिबीर घेणार आहेत. अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यातील पंधरा गावांची निवड करुन जिल्हयातील नमुद ९० ते १२० गावांमध्ये किमान २० ते २५ हजार शेतक-यांपर्यंत खरीप मोहिमेतुन तंत्रज्ञान प्रसार होणार आहे.

खरीप मोहिम २०२५ साठी निवडलेल्या गावांची यादी, गावनिहाय वेळापत्रक व संबधित नोडल अधिका-यांचे नावासह जोडत आहे तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. गावस्तरावर शेतकरी बांधवांचा अधिक सहभागाकरीता सरपंच, कृषि सखी, पोलिस पाटिल व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात येईल.  जिल्हयातील शेतकरी बांधवांनी विकसीत कृषि संकल्प अभियानामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर