मानोरा:-- तालुक्यातील खापरदरी-गिरडा या गावात आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी श्री देविदास खेमचंद राठोड यांना परवाना देण्यात आला आहे.मात्र संबंधित व्यक्ती ह्याचा गैरवापर करत असल्याची तक्रार खुद्द खापरदरी ग्रामपंचायत ने वरिष्ठ स्तरावर केली आहे.
खापरदरी, गिरडासाठी परवाना देण्यात आलेला असतांना गावापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदूरजना आढाव या ठिकाणी संबंधित परवानाधारक व्यक्ती सेवा केंद्र चालवत असून गावातील लोकांना आपल्या कामकाजसाठी त्या ठिकाणी बोलवतो. त्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नसल्याने लोकांना आर्थिक, शारीरिक त्रास व नामुष्की होते त्यामुळे गावातील जनता या गोष्टीला त्रासली आहे. तसेच संबंधित व्यक्ती सामान्य जनतेशी आणि विशेष करून महिलांशी उद्धटपणे वागतो, त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे गोळा करतो, कोणतेही काम वेळेवर करत नसल्याचे तक्रारीमध्ये सरपंचांनी नमूद केले आहे.
आपले सरकार असे संबंधित कामा संदर्भात चौकशी केल्यास उडवा उडविचे उत्तर देऊन लोकांचा मानसिक छळ करतो त्यामुळे अश्या माणसाला आपले सेवा केंद्र चालवन्यासाठी देऊ नये अशी सर्व लोकांची तक्रार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे त्यानुसार ग्रामपंचायत खापरदरी ने ही तक्रार वरिष्ठ स्तरावर केली असून त्वरित परवाना रद्द करावा अशी मागणी केली असल्याचे महिला सरपंचाचा अंगठा असलेल्या निवेदनाद्वारा पुढे आले आहे.
No comments:
Post a Comment