यवतमाळ,,दि.२० मे २०२५; (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
वीज ही अत्यावश्यक सेवा आहे,याची जाणीव ठेवून जिल्ह्यातील सर्वच वर्गवारीच्या ग्राहकांना अखंडित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी काम करा,मुख्यालयी थांबा,ग्राहकांशी संवाद वाढवा, त्यांच्या तक्रारी एैका एवढेच नाही तर,त्या तक्रारी वेळेत सोडवा असे स्पष्ट निर्देश देत कामात हयगय सहन केल्या जाणार नाही असा सुचक इशाराही मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी यवतमाळ येथील आढावा बैठकीत दिला.
विद्युत भवन यवतमाळ येथे मुख्य अभियंता यांनी जिल्ह्याचा प्रथमच आढावा घेतला.यावेळी अधीक्षक अभियंता प्रविण दरोली,कार्यकारी अभियंते संजय खंगार (प्रशासन),पुरूषोत्तम चव्हाण,नरेंद्र कटारे,ब्रजेश गुप्ता,जनार्दन चव्हाण,व्यवस्थापक प्रमोद चव्हाण,जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अभियंते तसेच यवतमाळ शहरातील सर्व सहाय्यक अभियंते या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य अभियंता म्हणाले की,मान्सुन पुर्वीचा काळ हा महावितरणसाठी संक्रमणाचा काळ असतो,त्यामुळे पुर्वानुभव बघता देखभाल दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करा,देखभाल दुरूस्तीची कामे ही वीज ग्राहकांच्याच नाही तर महावितरणच्याही हिताची आहे. यावेळी रविवारी जिल्ह्यातील काही भागात वादळ -वाऱ्यामुळे प्रभावित झालेला वीज पुरवठा आणि दुरूस्तीचा आढावा घेत ऊर्वरीत दुरूस्तीची कामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पुढे बोलतांना मुख्य अभियंता म्हणाले की,जिल्ह्यात वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.यामागील कारण शोधले पाहिजे,प्रत्येक शाखा अभियंता यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जास्त वीज गळती असलेल्या वाहिन्या यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरील वीजचोरी आणि तांत्रिक गळती कमी करण्यासाठी जोरकस सामूहिक प्रयत्न केले पाहिजे,वीज चोरांवर कारवाई केली पाहिजे,ग्राहकांशी संवाद वाढविला पाहिजे,एवढेच नाही तर आपल्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देऊन त्यांना आपल्या कामाची माहिती दिली पाहिजे,
यावेळी मुख्य अभियंता म्हणाले की, ग्राहक हे महावितरणसाठी महत्वाचे असून त्यांना सर्वच सेवा आणि सुविधा गतीने देण्याबरोबरच अखंडित वीज पुरवठा आणि तात्काळ वीज जोडणी यावर भर द्या, ग्राहकसेवा आणि विविध योजनांची अंमलबजावणी यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोवाच केले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री सौरघर मोफत वीज योजना, सौर ग्राम योजना, मागेल त्याला सौर पंप,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदींचा सविस्तर आढावा घेत अंमलबावणीला गती देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिलेत.
No comments:
Post a Comment