गोंढळा (पो. लेहणी, ता. रिसोड, जि. वाशिम) – येथील रहिवासी व बुधवासी ज्येष्ठ नागरिक शिवराम भिकाजी नवघरे यांचे वृद्धापकाळाने दिनांक २१ मे २०२५ रोजी बुधवारी सकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय १०८ वर्षे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार जलदान विधी व श्रद्धांजली सभा दिनांक २४ मे २०२५ रोजी (शनिवार) सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सर्व नातेवाईक, ग्रामस्थ व हितचिंतक यांनी या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment