Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, May 21, 2025

घरात पाणी शिरले, उपजीविकेचं नुकसान : शेंदुर्जना अढाव येथील बंडुसिंग राठोड यांचा आक्रोश ग्रामपंचायत प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

शेंदुर्जना अढाव (ता. मानोरा) : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)येथील बंडुसिंग मोहन राठोड हे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांचे घर समोर असलेल्या नाली काडी कचरा व  तुडूंब भरल्याने  पाणी थेट त्यांच्या घरात शिरले. सतत ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे नाली साफ-सफाई व जलनिकासी बाबत निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे राठोड कुटुंबाच्या घरात भरपूर पाणी साचले. रात्रभर त्यांनी पाण्यातच वेळ काढली. या पुरसदृश्य परिस्थितीत त्यांचा उपजिविकेचा गहू व इतर आवश्यक सामान पाण्यात वाहून गेले. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून आता उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत व पंचायत समितीला वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकारानंतर प्रशासनाने तत्काळ मदतीचा हात द्यावा व अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून नाली व जलनिकासी यंत्रणेची नियमित स्वच्छता व देखरेख ग्रामपंचायत ने करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर