यवतमाळ,दि.०६ मे २०२५; (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
महावितरण अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून सोमवार (दि.५ मे)श्री.अशोक साळुंखे यांनी पदभार स्विकारला.परिमंडळाअंतर्गत वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांची बदली मुख्य कार्यालयात झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची वर्णी लागली आहे.
तत्कालिन एमएसईबी आणि महावितरणमधील सेवेचा २८ वर्षाचा अनुभव असलेले श्री सांळुखे हे मुळचे जळगाव जिल्ह्याचे रहीवाशी आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी पुर्वी त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदविका यवतमाळ जिल्ह्यातून प्राप्त केल्यामुळे विदर्भासी त्यांचे विशेष नाते-संबंध आहे.
१९९८ मध्ये जळगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाल्यानंतर उपकार्यकारी अभियंता,
अतीरिक्त कार्यकारी अभियंता पदोन्नतीवर काम सांभाळले आहे, त्यानंतर २०१३ मध्ये सरळ सेवेतून मुख्य कार्यालय मुंबई येथे कार्यकारी अभियंता म्हणून बढती मिळाली. त्याठिकाणी त्यांना पायाभूत सुधारणेसाठी असलेला RAPDRP या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काम केले,त्याचबरोबर २०१४ ला सरळ सेवेतून अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा आणि नंतर अधीक्षक अभियंता प्रकल्प म्हणून मुख्य कार्यालयात महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच या दरम्यान वितरण हानी कमी करण्यासाठी आणि सिस्टीम स्ट्रेन्दनिंग आणि मॉडरनाईजेशन साठी अत्यंत महत्वाच्या आरडीएसएस या योजनेचा डीपीआर तयार करून त्याची मंजूरी घेणे आणि सुमारे २५ हजार कोटी रूपयाच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा काढणे इत्यादी महत्वाची कामे त्यांनी यशस्वीपणे हाताळल्यानंतर सरळ सेवेतूनच त्यांना मुख्य अभियंता म्हणून बढती मिळाली आहे.
मुख्य अभियंता म्हणून परिमंडळाची सुत्रे हाती घेताच त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्यासंदर्भात महावितरणचे काम असावे असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment