Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, May 6, 2025

खरीप हंगामासाठी महाबीज सज्ज ४ हजार ५३५ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम: आरक्षण योजनेचा प्रारंभ


वाशिम,दि.६ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) महाबीज जिल्हा व्यवस्थापनाकडून यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात असून खरीप हंगामासाठी महाबीज सज्ज झाले आहे. या हंगामात सोयाबीन, तूर, मूग, व उडीद या पिकाचे ४ हजार ५३५ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. अशी माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. सावरकर यांनी दिली.          
    महाबीज दरवर्षी खरीप हंगामात विविध पिकांच्या विविध वाणाचा पायाभुत आणि प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव, मानोरा तालुक्यात हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेचा प्रारंभ झालेला असून शेतक-याचा प्रतिसाद पाहता नियोजनातील उदिष्ट पूर्ण होण्याचा विश्वास महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.


 यंदा जिल्ह्यातील सहा तालुक्यात  सोयाबीन ४ हजार ५०८ हेक्टरवर, १७ हेक्टरवर तुर, ५ हेक्टरवर मुंग,५ हेक्टरवर उडीद बिजोत्पादन  कार्यक्रम राबविला जाणार आहे. यावर्षी नवीन वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रमाला शेतक-याचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे महाबीजच्या नियोजनातील उद्दिष्ट लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.


यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजने पूर्ण नियोजन केलेले आहे. यंदा सोयाबीन ३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रात बिजोत्पादन कार्यक्रम नियोजित केला असून यामध्ये ५ वर्षा आतील वाण फुले किमया, एम.ए.सी.एस-१४६०, एम.ए.यु.एस-७२५, पी.डी.के.व्ही-अंबा, फुले दुर्वा, राज सोया, सुवर्ण सोया इ. ०५ ते १५ वर्षातील वाण जेएस-२०११६, एम.ए.यु.एस-६१२, फुले संगम व  १५ वर्षा वरील वाण जेएस-३३५, जेएस-९३०५, एम.ए.यु.एस-७१ वाणाचा समावेश आहे. तूर पिकामध्ये १० वर्षा आतील बिडीएन-७१६ व वरील आय.सी.पी-८८६३, उडीद १० वर्षा वरील वाण टी.ए.यु-१, मुंग पिकामध्ये १० वर्षा आतील फुले चेतक वाणाचा समावेश आहे. ”
    
         एस. एस. सावरकर
    जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम





 बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनासाठी शेतक-यांनी तालुका स्तरावरील महाबीज कार्यालयास भेट दयावी तसेच बिजोत्पादन कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदणीसाठी महाबीज बिजोत्पादन कार्यक्रम मागणी अर्ज, सात बारा किंवा ८ अ, आधार कार्ड इ. दस्तावेज आवश्यक असून खरीप २०२५ हंगाम मधील बिजोत्पादन कार्यक्रम उपलब्ध स्रोत बियाणे नुसार लवकरच वाटप करण्यात येईल. 
       एन. एम. पुसाम
    कृषी क्षेत्र अधिकारी, वाशिम

No comments:

Post a Comment

फॉलोअर