मानोरा:--या ना त्याकारणाने मानोरा शहराची लौकिकतेत दिवसागणित वाढ होत आहे.याचेच प्रत्यय मानोरा खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोर फेरफटका मारताना येतो. शेतकऱ्यांना संजीवनी दाता म्हणून खरेदी विक्री संघाकडे बघितल्या जाते परंतु मानोरा येथील खरेदी विक्री संघ राजकीय पुढाऱ्यांचे बैठकीचे स्थान बनले असून येथे विविध पक्षाचे पदाधिकारी खुर्च्या दाबत बसून राहत असल्याचे बोलले जाते.
महाबीजचे बियाणे अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना देऊन तथा शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी विक्रीसाठी खरेदी विक्री संघ हा पुढाकार घेत असतो.
परंतु मानोरा तालुक्यातील खरेदी विक्री संघ हे केवळ राजकीय सोईचे पद बनले आहे. मागील सहा महिने आधी येथिल अध्यक्षांचे अकस्मित मृत्यूनंतर नियुक्त झालेल्या खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षा सौ.सपना देशमुख यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या क्रियाशीलतेत वाढ करून शेतकऱ्यांना सोयी सवलतीत, बी- बियाणे व खते उपलब्ध करून देत जिल्ह्याच्या नकाशावर मानोरा खरेदी-विक्री संघाचे नाव कोरण्याचे संकल्प व्यक्त केले होते.
परंतु पेरणीच्या तोंडावरही मानोरा तालुक्यातील शेतकरी सैरभैर पळत असताना या खरेदी विक्री संघात ना खत आले ना बियाणे आले आहेत. खरेदी-विक्री संघाच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून खरेदी विक्री संघाचे कार्यालय सार्वजनिक मुतारीचे प्रख्यात ठिकाण असल्यागत या परिसराची अवस्था झालेली आहे.
खरेदी विक्री संघात तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना नाका तोंडाला शेला व रुमाल धरून येण्याशिवाय पर्याय नसल्याने खरेदी विक्री संघ पदाधिकारी व प्रशासन येथे कशाप्रकारे कामकाज चालवतात यासंदर्भात सुद्धा शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा दुर्गंधीमुळे आता चर्चा करायला लागलेले आहेत.
फोटो---
No comments:
Post a Comment