दिग्रस : दहावी हा विद्यार्थी जीवनातील परीक्षेचा अगदी सुरवातीचा टप्पा. यापुढे आयुष्यात अनेक परीक्षा द्यायच्या असून जीवनाची खरी परीक्षा तर या सर्वांपेक्षा वेगळी! म्हणून दहावीत मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पुढील परीक्षांमध्ये आणखी जास्त मेहनत, जिद्द, चिकाटी व संघर्षाने यश मिळवायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन 'बालभारती'चे माजी सदस्य डॉ याहया नशीत यांनी केले. ते कलगाव येथे वसंतराव नाईक उर्दू हायस्कूल द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी नागपूर उच्च न्यायालयाचे ॲड मोहम्मद अशफाक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमीन चौहान, हाजी जलीलोद्दीन, बब्बू शेख, म. जावेद, फारुक अहेमद, उपसरपंच साजेदा परवीन, अलीमोद्दीन शेख, डॉ. माजीदोद्दीन, कारी निजामोद्दीन शेख, मुख्याध्यापक सैय्यद हबीब मंचावर उपस्थित होते.
मुस्लिम समाजात शिक्षणा अभावी अधोगती पाहायला मिळते. खरं तर पवित्र कुराण मध्ये दीडशे जागी 'इल्म' म्हणजे शिक्षणाचा उल्लेख आला आहे. ज्या प्रमाणे कलमा, रोजा नमाज, हज आणि जकात हे पाच फर्ज इस्लाम मध्ये नमूद आहेत आता 'इल्म' म्हणजे शिक्षणाला सहावा फर्ज मानून समाजाने शिक्षणाकडे वळायला हवं. शिक्षणाचे महत्व विषद करतांना ते म्हणाले की ज्यावेळी समाजात शिक्षण होते त्यावेळी समाज प्रगती पथावर होता. पण दुदैवाने हळूहळू समाजातील शिक्षण कमी होत गेले आणि समाज अधोगतीला लागला. त्यामुळे शिक्षणाशिवाय आता तरणोपाय नाही हे समाजाने लक्षात घ्यायला हवे असे आग्रही प्रतिपादन डॉ नशीत यांनी केले.
दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांशी यावेळी शिक्षक सैय्यद जुनेद, आमीन चौहान आणि शायर जफर कलगावी यांनीही संवाद साधला. खनसा मरीयम एजाज़ोद्दीन शेख, इफरा माहिन शेख जावेद, तयबा उरूज शेख शराफत, अन्शीरा सना मो. तौफीक, महेक अफशा आरीफोद्दीन गुणवंत मुलींचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन अंजूम आरा मो. अनीस यांनी तर आभार मुख्याध्यापक सैय्यद हबीब यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अजहरोद्दीन शेख यांचेसह
शिक्षक मो. तौकीर शेख सुफी, वसीमोद्दीन खतीब, शबाना परवीन मो.अकील, शाहिस्ता परवीन, अलीमोद्दीन शेख या शिक्षकांनी परिश्रम घेतले. या सत्कार सोहळ्याला अख्तर कुरेशी, पत्रकार राजाराम राठोड, सेवानिवृत्त शिक्षक सैय्यद शब्बीर, ज्ञानेश्वर मोहिते, शिक्षक अमीन नौरंगाबादे यांचेसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment