Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 24, 2025

'सीएम'चा १०० दिवस उपक्रम; वाशिम 'सीएस' राज्यात सर्वोत्तम ! जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल ; आरोग्य सेवेचा नवा मापदंड

वाशिम : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)वाशिम जिल्ह्याला अभिमान वाटावा, अशी ऐतिहासिक कामगिरी जिल्हा सामान्य रुग्णालयाने केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "१०० दिवस विशेष कार्यक्रमात" वाशिम जिल्हा रुग्णालयाने संपूर्ण महाराष्ट्रात पहिले स्थान पटकावले आहे. यानिमित्ताने राज्यात वाशिमचे सीएस (जिल्हा शल्य चिकित्सक ) सर्वोत्तम ठरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाची संकल्पना साकार करण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम ' आखून दिला होता. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील कार्यक्षमतेसह संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, तंत्रज्ञानाचा वापर आणि गुंतवणुकीस चालना या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. 
आरोग्य क्षेत्रात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाने संपूर्ण निकषांची पुर्तता करीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. १०० दिवसाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी व संपूर्ण चमूने कठोर परिश्रम घेतले.
वाशिम जिल्हा रुग्णालयाचे हे यश आरोग्य व्यवस्थेतील सकारात्मक बदलाचे प्रतीक असून, भविष्यातील आरोग्य धोरणांसाठी एक आदर्श दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.
...........

राज्यात वाशिमचा नवा रेकॉर्ड !

यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम निर्देशांक अंमलबजावणीत दरमहा कामगिरीत राज्यात जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातून वाशिमचे डॉ. अनिल कावरखे पाच वेळा प्रथम तर वार्षिक कामगिरीत देखील राज्यात अव्वल होते. आता  'सीएमच्या १०० डेज' उपक्रमातही वाशिमचे जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम आले. आरोग्य विभागाच्या इतिहासात हा मान केवळ वाशिमलाच मिळाल्याने नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेला.
.............

कोट 

हे यश केवळ माझ्या एकट्याचेच नाही तर जिल्हा रुग्णालय प्रशासनाची संपूर्ण चमू, आरोग्य अधिकारी व  कर्मचाऱ्यांच्या सांघिक व प्रामाणिक प्रयत्नांचे फलीत आहे. यासोबतच जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांचे मोलाचे मार्गदर्शनही आहे. भविष्यातही दर्जेदार आरोग्य सेवा देण्यास कटिबद्ध राहील.

- डॉ. अनिल कावरखे, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
................

No comments:

Post a Comment

फॉलोअर