मानोरा:-- शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे कौटुंबिक व आर्थिक स्वास्थ बिगडविण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या जुगार, मटका, वरली यांच्या दुकानदाऱ्या शहरातील मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये राजरसपणे सुरू असून गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील ग्रामीण भागामधील गावठी व देशी, विदेशी दारूच्या बेकायदेशीर दुकानदाऱ्या उध्वस्त करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेले या अनैतिक व्यवसायांवर कारवाईची कुऱ्हाड कधी कोसळेल याची आतुरतेने शहर व तालुक्यातील नागरिक वाट पाहत आहेत.
मानोरा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बीट मधील अनेक गावांमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री याची अचूक माहिती आपल्या खबऱ्यांमार्फत पोलीस प्रशासनांला नेमकी मिळते व शहर आणि तालुक्यातील नागरिकांना नशेच्या अंमलात आणणाऱ्या ह्या अंमली पदार्थाचे उत्पादन, व्यवसाय यांच्यावरील कारवाईच्या असंख्य बातम्या दररोज अनेक वृत्तपत्रांमध्ये फोटोसहीत भरभरून प्रकाशितही होत असतात. मानोरा शहरात मात्र मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले व जागरिक नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर काही काळ बंद केल्यासारखे केलेल्या व नागरिकांचे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक जीवन उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या जुगार, वरली, मटका आदी प्रकार शहरात परत जोमाने चालू असूनही स्थानिक पोलीस प्रशासनाला हे अवैध धंदे कसे आढळून येत नाहीत यामुळे सगळे नागरिक बुचकळ्यात पडल्याच्या चर्चा सुद्धा शहर व तालुक्यामध्ये रंगत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांनी मानोरा शहरात सुरू असलेल्या वरली, मटक्याच्या धंद्यावर आकस्मिक धाड घालण्याचे धाडस दाखविले होते तसे धाडस मानोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी का दाखवू शकत नाहीत अशा चर्चा सुद्धा या वरली मटक्याच्या बेकायदेशीर धंद्यामुळे शहर व तालुक्यात चर्चील्या जात आहेत.
No comments:
Post a Comment