Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, May 26, 2025

मुख्य रस्त्यावर लटकणारी बाबळीची फांदी अपघातास आमंत्रण : ग्रामस्थांतून तीव्र नाराजी


मानोरा.  ( साप्ता.दिग्रस एक्सप्रेस) गव्हा ते आसोला (हांडे) मुख्य रस्त्यावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बाबळीच्या झाडाची एक मोठी फांदी लटकत असून ती कोणत्याही क्षणी गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते. विशेषतः आसोला हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे या मार्गावर भाविकांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे सदर फांदी तात्काळ काढून टाकावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

ही बाब लक्षात घेऊन गव्हा गावातील काही नागरिकांनी गव्हा ग्रामपंचायतचे सरपंच श्री. आनंदभाऊ देशमुख यांना यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी याची तातडीने दखल घेण्याची विनंती केली आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती फांदी तातडीने काढावी, जेणेकरून अपघाताच्या घटना टाळता येतील, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

सदर प्रकरणाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment

फॉलोअर