Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, May 27, 2025

सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना 'महाराष्टाचा अभिमान पुरस्कार-२०२५ प्रदानविविध मान्यवर व सिनेअभिनेञीच्या हस्ते व ऊपस्थीत चंद्रपुर येथे झाला सन्मान

मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यातील सर्वपरिचित तथा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे तसेच आपल्या लेखणीव्दारे तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणारे पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना यंदाचा 'महाराष्टाचा अभिमान पुरस्कार-२०२५ मिळाला आहे.चंद्रपुर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात एका दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवर व सिनेअभिनेञी यांच्या हस्ते गौरविन्यात आले आहे.
             दि. २४ मे रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शिका, कमवा व प्रगती करा' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशन, रेल्वे यात्री एकता मजूर संघ, आणि राष्ट्रीय उद्योग भारत तथा पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.'शिका, कमवा व प्रगती करा' हा अभियान सकाळी ९:०० वाजता सुरू झाले व सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालले. या कार्यक्रमात रोजगार, उद्योग प्रशिक्षण आणि महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार २०२५ चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक आदिवासी विभाग राज्यमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थीत होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ऊपस्थीत राहणार होते पण महत्वाच्या कामामुळे कार्यक्रमाला फोनव्दारे शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री रांगडा मुवी फेम कु. मयुरी नव्हाते या विशेष अतिथी म्हणून उपस्थीती होती तसेच राष्ट्रीय उद्योग संघटनेचे महामंत्री सुनिल कुमार मांडवे, शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गिरिजा ताई उईके, पोलिस उपनिरीक्षक कु. दीप्ती मरकाम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम बेरोजगार तरुणांसाठी विशेष संधी देणारा होता. विविध प्रशिक्षण सत्रांद्वारे युवकांना नवीन कौशल्ये शिकण्याची आणि त्याद्वारे नोकरीच्या संधी मिळवण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशनचे सीईओ, डॉ. रमेशकुमार बोरकुटे आणी अध्यक्षा कु.एलिजा बोरकुटे यांनी केले असून, त्यांचा उद्देश बेरोजगारी दूर करणे आणि तरुणांना स्वावलंबी बनवणे हा आहे.या भव्यदिव्य कार्यक्रमात वाशिम जिल्ह्याचे नामांकीत पञकार तथा सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना अभिमान महाराष्टाचा पुरस्कार मान्यवर आणी सेलीब्रेटीच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले आहे.फुलचंद भगत यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर