Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, May 28, 2025

विज कडाडल्याने चुंबकीय क्षेत्र निर्माण होवून वीज यंत्रणा होते प्रभावित**रात्रीपासून वीज यंत्रणा दुरूस्तीचे युध्दपातळीवर काम सुरू**प्रभावित झालेल्या २५ उपकेंद्रांचा वीज पुरवठा काही तासात पुर्ववत**महावितरण कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अतीरिक्त कंत्राटदार कर्मचारी मदतीला*


*यवतमाळ,दि.२८ मे २०२५; (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
         मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यामुळे खंडित झालेल्या जिल्ह्यातील ,२५ उपकेंद्राचा वीज पुरवठा महावितरणच्या रात्रभर सुरू असणाऱ्या युध्दस्तरावरील प्रयत्नामुळे पुर्ववत करण्यात आले आहे.अद्याप काही भागाचा बंद असलेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कार्यरत असून अश्या आपात्कालिन परिस्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

           महावितरणच्या वीज वाहिन्याचा प्रवास हा शेकोडो किमी लांब आणि मैदानी तसेच जंगली भागातून झालेला असतो.त्यामुळे वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून वीज वाहिव्यावर पडणे,फांद्या वीज वाहिन्यात अडकणे यामुळे शेकडो वीज खांब जमिन दोस्त होतात आणि वीज वाहिन्यांचेही नुकसान होते.तसेच मुसळधार पावसादरम्यान  विजांच्या कडकडाटामुळे महावितरणची वीज आणि आकाशातील वीज या दरम्यान चुंपकीय क्षेत्र निर्माण होऊन वीज यंत्रणेत बिघाड होते,यामध्ये प्रामुख्याने वीज खांब तसेच उपकेंद्रातील (चिनी मातीचे)पीन इन्सुलेटर,डिस्क इन्सुलेटर फुटतात/पंक्चर होतात आणि वीज पुरवठा खंडित होतो.

       काल दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे यवतमाळ विभागातील प्रभावित झालेल्या पाच उपकेंद्राचा वीज पुरवठा काही तासातच पुर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. पावऊस थांबण्याची तमा न बघता कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण व त्यांच्या संपूर्ण टिमने ३३ केव्ही विद्युत भवन उपकेंद्राला ३३ केव्ही पिंपळगाव उपकेंद्रातून बॅकफिडींग केल्यामुळे शहरातील मोठ्या भागाचा वीज पुरवठा सुरू झाला.तसेच ३३ केव्ही कोळंबी उपकेंद्राला ३३ केव्ही घाटंजी उपकेंद्रातून बॅकफिडींग करण्यात आले,३३ केव्ही दाभा, ३३ केव्ही सावर  उपकेंद्राला ३३ केव्ही बाबुळगाव उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्था वापरून वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात आला.


      तसेच दारव्हा विभागात वीज वाहिन्यावर झाडे पडली होती,तसेच अनेक ठिकाणी वीज खांबावरील तसेच उपकेंद्रातील  पीन / डिस्क इन्सुलेटर (चिनी मातीचे) फुटल्यामुळे दारव्हा विभागातील  दारव्हा,दिग्रस,आर्णी व नेर तालुक्यातील १२ उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता,परंतू चालू पावसात अंधाराची तमा न बाळगता  राना-वनात जाऊन केलेल्या युध्दस्तरावर केलेल्या प्रयत्नामुळे रात्री १२ वाजेपर्यंत ५ उपकेंद्राचा आणि रात्री ३ वाजेपर्यंत उर्वरित ७ उपकेंद्राचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता व त्यांच्या संपूर्ण विभागीय टिमला यश आले आले.

       मुसळधार पावसाचा जोर जिल्ह्यात सर्वत्र असल्याने पांढरकवढा आणि पुसद विभागातही महावितरणची यंत्रणा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. यामध्ये पुसद विभागातील ५ आणि पांढरकवढा विभागातील ३ उपकेंद्रे प्रभावित झाल्यानंतर तत्काळ दुरूस्ती कार्याला सुरूवात झाल्यामुळे कृषी वगळता सर्वच गावाचा वीज पुरवठा रात्रीतून पुर्ववत करण्यात महावितरणच्या टिमला यश आले आहे.जिल्ह्यातील महावितरणच्या संपूर्ण वीज परिस्थितीवर मुख्य अभियंता अशोक साळुंके आणि अधीक्षक अभियंत लक्ष ठेऊन आहेत.

No comments:

Post a Comment

फॉलोअर