मानोरा ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत २०२५-२६ साठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरावरून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत प्रोत्साहनाच्या स्वरूपात अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ६० हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानाची तरतूद आहे. तालुकास्तरावरून विशेष शिबिरे आयोजित करून पात्र शेतकऱ्यांना योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
ही मोहिम दिनांक १५ जून २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in) ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी व आवश्यक सहाय्यासाठी तालुक्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment