Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, June 10, 2025

राष्ट्रीय निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूरच्या शास्त्रज्ञांची प्रगतशील शेतकरी विशाल ठाकरे यांच्या संत्रा फळबागेस भेट

मानोरा १० जून –( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)राष्ट्रीय निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर (भा.कृ.अ.नू.प., नवी दिल्ली) येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने प्रगतशील शेतकरी श्री. विशाल ठाकरे यांच्या संत्रा फळबागेला नुकतीच अभ्यासदौऱ्याद्वारे भेट दिली. ही संत्रा फळबाग वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका येथील बेलोरा गाव परिसरात स्थित असून, श्री. ठाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संत्रा लागवडीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

शास्त्रज्ञांनी फळबागेतील सुधारित सिंचन पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच जैविक पद्धतींचा वापर याची सखोल माहिती घेतली. त्यांनी श्री. ठाकरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत संत्रा उत्पादकांसाठी हे मॉडेल मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले. या भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी काही तांत्रिक मार्गदर्शनही केले आणि संत्रा उत्पादनात गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उपाय सुचवले.

या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल व टिकाऊ शेतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रक्षेत्र भेटीला नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर दास, डॉक्टर सांगळे, कृषी विज्ञान केंद्राच्या वाटाणे मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वाढवे व इतर शेतकरी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

फॉलोअर