Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, June 16, 2025

सिंदूर योद्धाचे मानोरा शहरवासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत सीमा सुरक्षा बल व जवान सुनील वाघमारे चा जयघोष


मानोरा ... (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांना जीवे मारण्यास प्रोत्साहित करणाऱ्या आतंकवादी समर्थित पाकिस्तान ह्या देशाविरोधात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर मधील सहभागी सीमा सुरक्षा दलातील जवान याचा सत्कार मानोरा शहर व तालुका वाशी यांच्यावतीने आज शहरातील शिवाजी चौकात करण्यात आला.  
नुकत्याच भारत पाकिस्तान युद्धामध्ये सिंदूर ऑपरेशन मध्ये भारत देशाकडून पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देऊन दिवस-रात्र देशाचे रक्षण करणारे आपल्या तालुक्यातील मोहगव्हाण पारवा येथील भुमिपुत्र सुनील वाघमारे बीएसएफ जवान यांची व त्यांच्या अर्धांगिनी यांचा सन्मान अभिजित पाटील धामणी व तालुक्यातील राष्ट्रप्रेमी युवक नागरिकांच्या  वतीने करण्यात आले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे हार घालून दर्शन घेण्यात आले त्यानंतर त्यांचा शिवाजी चौकातच सपत्नीक अभिजीत पाटील धामणी, राजेश मस्के, आनंदा खुळे, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन गिरे, बाबुराव भोयर,श्याम पवार ,विजय जाधव, गोपाल चव्हाण, सुनील राठोड, आशिष राठोड, व मोहगव्हाण, पारवा आणि  मानोरा तालुक्यातील राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी गोपाल चव्हाण व आनंदा खुळे यांनी जवान सुनील वाघमारे यांच्या कार्याबद्दल प्रकाश टाकला. यावेळी सेवालाल महाराज यांच्या झेंडयाचे सुद्धा पूजन जवान सुनील वाघमारे यांचा हस्ते करण्यात आले.


No comments:

Post a Comment

फॉलोअर