वसंतराव नाईक महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक बी.यु. राठोड आणि प्रा. सौ. अनिता राठोड यांचे चिरंजीव अभिजीत राठोड यांनी दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जागतिक पातळीवरील ९० किलोमीटर कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन देशाच्या नावलौकिकात भर घातलेली आहे.
अभिजीत राठोड हे सिडकोमध्ये अधिकारी असून अशा विविध स्पर्धेत ते नेहमी सहभाग घेत असतात. देशांतर्गत स्पर्धेतही त्यांने ६० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नटाल प्रांतात डर्बन आणि पिटर्मॅरिट्सबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाते. जगातील सर्वात मोठी ही मॅरेथॉन स्पर्धा खुप प्रतिष्ठेची मानली जाते. सततचे परिश्रम, चिकाटी आणि जिद्द या बळावर अभिजीत राठोड यांनी ८ जून २०२५ रोजी दक्षिण आफ्रीकेत पार पडलेल्या या जागतिक पातळीवरील स्पर्धेत भाग घेऊन त्यांने ९० किलोमीटरचे आंतर ११ तास २८ मिनिटे १६ सेकंदात पूर्ण करुन आपले आणि देशाचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने कोरले आहे.
जगातील ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी प्रतिष्ठित अल्ट्रा मॅरेथॉन मानली जाते. २०२७ मध्ये या स्पर्धेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या स्पर्धेत आजपर्यंत जगभरातून तीन लाखाहुन अधिक धावपटूंनी ही प्रतिष्ठेची स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यात अभिजीत राठोड यांने आपल्या नावाची भर टाकलेली आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
या स्पर्धेत आपले नाव सुवर्णाक्षराने कोरणारे सिडकोचे अधिकारी अभिजीत राठोड केवळ गोर बंजारा समाजासाठीच नव्हे तर तमाम देशवाशियांसाठी गौरवाची बाब असून त्याचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
अभिजीत राठोड यांचे आई वडील छत्रपती संभाजीनगर येथे बालकाश्रम चालवतात. प्रत्येकांनी या बालकाश्रमाला एकदा तरी भेट द्यावी असा सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. या दांपत्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी वर्षा इंजीनियर असून ती अमेरिकेत नोकरी करते.
नोकरी करता करता छंद जोपासणारे युवक आणि युवती किंवा स्त्री आणि पुरुष खुप कमी आहेत. त्यामुळे या हरहुन्नरी अभिजीत राठोड या युवकाचा सार्थ अभिमान वाटतो. अभिजीत राठोड यांच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा.
दिनांक : १५/६/२०२५
*फुलसिंग जाधव*
सामाजिक कार्यकर्ता
छत्रपती संभाजीनगर
संपर्क : ८९९९०९८२६५
-------------------------------
No comments:
Post a Comment