मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क).
वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असतानाच, ठेकेदारांनी गौण खनिजांची उचल नियमबाह्य पद्धतीने केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. धरणातील काळया मातीची रायल्टी काढून, दुसऱ्याच ठिकाणावर गौण खनिजांची उचल केली जात असल्याने शासनाची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
ठेकेदाराच्या अनागोंदीची उघडकीस
रेल्वे प्रकल्पामध्ये ठेकेदारांना आवश्यक असलेले गौण खनिज (रेती, मुरुम, दगड) हे शासनाच्या मंजुरीनुसार ठराविक ठिकाणांवरून उचलले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे खनिज दुसऱ्याच ठिकाणावरून उचलले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गावातील काही लोकांनी याची तक्रार केली असून, शासनाने याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
राज नागराज यांचा आरोप
रेल्वे प्रकल्पातील काम पाहणारे ठेकेदार राज नागराजन यांनी सांगितले की, "आमच्या सगळ्या कामाची देखरेख गावाचा सरपंचच करतो. गादेगाव ला. शासनाने ज्या ठिकाणांवरून रायल्टी दिली आहे, त्या त्या ठिकाणांना आजपर्यंत तालुका दंडाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किती भेटी दिल्या? ज्या प्रमाणात गौण खनिज उचलले जात आहे, त्या प्रमाणातच चौकशी झाली का? की जास्तच उचल झाली?"
शासनाची जबाबदारी आणि चौकशीची गरज
शासनाकडून दिल्या जाणाऱ्या रायल्टी परवानग्यांमध्ये स्पष्ट नमूद असते की, गौण खनिज उचलताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, ठेकेदाराने दुसऱ्या ठिकाणांहून खनिज उचलल्यास, शासनाची महसुलाची हानी होते. त्यामुळे, प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.
तालुका दंडाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात
गावकऱ्यांच्या मते, प्रशासनाने रायल्टी मंजूर केलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात किती खनिज उचल झाले, याची पडताळणी केली का? किंवा ठेकेदारांनी शासनाच्या मंजुरीविना खनिजांची उचल केली का? याची चौकशी आवश्यक आहे. शासनाच्या महसुलाची हानी होत असल्यास, संबंधित ठेकेदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शासनाकडून चौकशीची अपेक्षा
या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी तत्काळ चौकशी सुरू करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. शासनाच्या निधीची आणि नैसर्गिक संपत्तीची फसवणूक करणाऱ्यांना मोकाट सोडू नये, अशी गावकऱ्यांची भूमिका आहे.
रेल्वेचे चुकीच्या रायलटी मुळे परिसरातील शेकडो शेतकरी आपल्या शेतात काळी माती टाकून न शकल्यामुळे त्यांच्यावर फार मोठा अन्याय झाला आहे
No comments:
Post a Comment