Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, June 23, 2025

औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी महावितरणचा पुढाकार


यवतमाळ, दि. २३ जून २०२५;( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
      जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या ग्राहकांना अखंड व स्थिर वीज पुरवठा देण्याचा महावितरणचा प्रयत्न सुरूच असून, औद्योगिक ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी महावितरणने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. महावितरणने औद्योगिक ग्राहकांना ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी एक लिंक तयार केली असून औद्योगिक ग्राहकांनी या लिंकवर जाऊन आपल्या वीज सेवेशी संबंधित तक्रारी नोंदविण्याचे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

            औद्योगिक ग्राहक हे महावितरणसाठीच नाही तर,जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांना दर्जेदार सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांच्या पुढाकारातून औद्योगिक ग्राहकांच्या तांत्रिक अडचणी किंवा अन्य वीज सेवा विषयक तक्रारी तत्काळ सोडविण्याच्या अनुशंघाने जिल्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी  https://docs.google.com/forms/d/e1FAIpQLSe05WoG2ZtWAqRd0qORu-dUZKci6ldgXOmmmI--Q3eYm5vu3w/viewform?usp=dialog लिंक त्यार करण्यात आली आहे.  ही लिंक फक्त औद्योगिक ग्राहकांसाठीच असून ग्राहकांना या लिंकवर जाऊन तक्रारीसोबत आपली थोडक्यात माहिती द्यावी लागणार आहे.

      औद्योगिक ग्राहकांसाठी वीज हे उत्पादनक्षमतेचं प्रमुख साधन असल्याने, त्यांच्या अडचणी दूर करणं ही महावितरणची प्राथमिकता आहे.महावितरणकडून औद्योगिक क्षेत्रातील वीज पुरवठा अधिक सक्षम आणि विश्वसनीय करण्याच्या दृष्टिने महावितरणने घेतलेला पुढाकार आहे. तक्रारींचे निराकरण ही त्यातली महत्त्वाची कडी आहे. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रसंग कमी होतील ,परिणामी उत्पादनावर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा महावितरणने व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर