वाशिम,दि.२२ जुन (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जुन २०२५ रोजी 'जागतिक योग दिनानिमित्त कक्ष क्र. १३, जिल्हा व सत्र न्यायालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या राज्य गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे उपस्थित होते.
योग प्रशिक्षक आशिष सिताराम जामकर यांनी सर्व उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. तसेच २०२५ ची योगा थिम 'एक पृथ्वी, एक आरोग्य' याअनुषंगाने योगाचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमात मुख्यालयात कार्यरत सर्व न्यायीक अधिकारी तसेच अॅड. ए. एस. बाकलीवाल, अध्यक्ष जिल्हा विधिज्ञ मंडळ, विधिज्ञ मंडळातील इतर सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड. परमेश्वर आ. शेळके, मुख्य न्यायरक्षक यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड. वैभव तिफणे, उपाध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ यांनी केले.
या कार्यक्रमात न्यायीक अधिकारी, विधिज्ञ मंडळातील सदस्य व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment