Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, June 20, 2025

श्रीराम महाराज सार्वजनिक वाचनालय चिखली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


चिखली (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – चिखली येथील श्रीराम महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सुप्रभात वंदनेनंतर ह भ प श्रीराम महाराज यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व, प्राचीन भारतीय परंपरेतील त्याचे स्थान आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात त्याचे महत्त्व पटवून दिले. यानंतर विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे सत्र पार पडले. लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक योगप्रेमींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वाचनालयाच्या वतीने बोलताना जगदीश राठोड अध्यक्ष यांनी सांगितले की, “शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा प्रभावी उपाय आहे. अशा कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये योगाबाबत जागरूकता वाढते.”

या प्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी, गावातील नागरिक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उत्तम रितीने पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर