विठोली (ता. दिग्रस) –(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)स्व. बळवंतराव निळकंठराव पाटील यांच्या तेराव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जी. प्र. प्रा. केंद्रीय शाळा विठोली येथे वर्ग 1 ते 5 मधील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. जयमालाताई पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक तथा पोलीस राजाभाऊ सावके, दीपक शेंडे, माजी सरपंच पिंटू वाळले, दिनेश ठाकरे, भाऊराव पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या सारिका पाटील, बालुताई ठाकरे, सौ. अर्चना राऊत आणि मंदाताई पाटील , उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला गावातील पुरुषोत्तम ढोले, लोमेश पाटील,गजानन गावंडे, गट्नाटू पाटील, आदी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक लोंढे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश पाटील यांनी मानले.
शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment