Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, June 19, 2025

जिल्हाधिकाऱ्यांची नवी वाटचाल: प्रशासन थेट जनतेच्या दारीजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. . यांची तात्काळ तक्रार निवारण मोहीम जिल्ह्यात प्रभावी


वाशिम, दि. १९ जुन (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून श थेट जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस आता तालुकास्तरावर पोहोचत आहेत. नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींवर मात करण्यासाठी व  त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी  करणारा ठरतो आहे.

प्रशासन हे जनतेच्या दारात पोहोचले पाहिजे, ही संकल्पना केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हाती घेतले आहे. वाशिमसारख्या ग्रामीण व आकांक्षित जिल्ह्यात विकासाचा वेग वाढवण्यासाठी त्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि ठोस अंमलबजावणी प्रशासनाची नवी ओळख निर्माण करत आहेत. 

 जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील तहसील कार्यालयात जाऊन थेट नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याची अभिनव मोहिम सुरू केली आहे. त्यांनी संबंधित यंत्रणांचे अधिकारी याच ठिकाणी उपस्थित राहावेत यासाठी निर्देश दिले असून, तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे जनतेला त्यांच्या समस्यांबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली असून, अधिकाऱ्यांमध्येही जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.

 जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. या नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि कठोर प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असलेल्या वाशिमला विकसित जिल्ह्यांच्या रांगेत आणण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या आणि अल्प पर्जन्यमान असलेल्या वाशिममध्ये ‘चिया सीड’ सारख्या कमी पाण्यावर पिकणाऱ्या आणि जास्त बाजारमूल्य मिळवून देणाऱ्या पिकाचा प्रसार करण्यात आला आहे. यासोबतच जलसंधारणासाठी निसर्गाच्या पावसाच्या पाण्याचा वापर करून 'शोष खड्डे' आणि 'जलतारे' निर्माण करून भूजल पातळी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

आरोग्य क्षेत्रातही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. हे त्यांच्या नियोजनशक्तीचे आणि कार्यक्षम व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.

प्रशासकीय समन्वय आणि गती वाढवण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या साप्ताहिक समन्वय समितीच्या बैठका या जिल्ह्यातील एक आगळी संकल्पना ठरली आहे. सर्व शासकीय विभाग एकाच ठिकाणी एकत्र येऊन थेट संवाद साधतात, त्यामुळे अनेक प्रलंबित कामांचा त्वरित निपटारा होतो.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या या योजनाबद्ध, कल्पक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे वाशिम जिल्हा प्रगतीच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देणारे त्यांचे हे प्रयत्न निश्चितच अन्य जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात तक्रार निवारण दिन : 
जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात जिल्ह्यातील सहाही तालुक्यामध्ये नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये दर मंगळवारी वाशिम तहसील दर बुधवारी मालेगाव आणि रिसोड बुधवारी मानोरा आणि मंगरूळपीर व शुक्रवार तहसील कार्यालय कारंजा येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर