Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 8, 2025

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी खेळाडूंनी उचलावी!- खोखो कोच फारुक चव्हाण

दिग्रस – (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समर बॅडमिंटन कॅम्पमध्ये सहभागी खेळाडूंनी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा महत्वपूर्ण संदेश दिला. या उपक्रमात खेळाडूंनी स्वतः झाडे लावून 'हरित भविष्याची' शपथ घेतली. खोखो प्रशिक्षक फारूक चव्हाण यांनी बॅडमिंटन खेळाडूंना ही शपथ दिली. खेळातील चपळतेसोबतच सामाजिक भान जपणाऱ्या खेळाडूंनी “एक खेळाडू – एक झाड” ही संकल्पना साकारत प्रत्येकाने एक झाड लावले.

पुढे ते म्हणाले की "खेळाडूंनी केवळ मैदानी खेळातच समाधान न मानता सामाजिक कार्यातही पुढाकार घ्यावा. झाडे लावणे आणि ती जगवणे ही काळाची गरज आहे. वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याची जबाबदारी युवा पिढीने विशेषतः खेळाडूंनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी."

समर बॅडमिंटन कॅम्पमध्ये सहभागी मुलांनी मोठ्या उत्साहाने शिसम, नीम या देशी झाडांचे मोहनाबाई आणि दीनाबाई शाळा परिसरात वृक्षारोपण केले. क्रीडा शिक्षक फैजान शेख, फारूख चव्हाण, आसिफोदिन काजी, अज़ीम शेख, सादिक गारवे, भाऊराव राठोड़, साक्षी जाधव, आशीष अगलदरे 
मनोज काटकर उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित पालक, मार्गदर्शक आणि स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केले. या निमित्ताने पर्यावरण रक्षणाची भावना तरुण पिढीत आणि खेळाडूंमध्ये रुजावी हा उद्देश होता.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमामुळे केवळ हरित वातावरणाची पायाभरणीच झाली नाही तर खेळाडूंमध्ये सामाजिक जाणीवही निर्माण झाली. आयोजक क्रीडा शिक्षकांनी यापुढेही असे उपक्रम नियमित राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

चौकट : 

वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आमची!
समाजात पर्यावरण दिनाच्या आणि इतरही निमित्ताने झाडे लावली जातात. मात्र या लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. झाडे लागवडीपेक्षाही त्यांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी उचलण्याचा संकल्प सहभागी क्रीडा शिक्षक आणि खेळाडूंनी केला. दिग्रस शहर आणि तालुक्यात लावलेल्या झाडांची जबाबदारी परिसरातील खेळाडूंना देण्याचे कार्य क्रीडा शिक्षक करणार आहेत. त्यामुळे तुम्ही झाडे लावा, आम्ही त्याचे पालकत्व स्विकारु असे आवाहन दिग्रस तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे तालुका क्रीडा संयोजक फैजान शेख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर