Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 8, 2025

पोहता न येणाऱ्या दोघांना चिमुकल्याच्या समयसूचकतेने मिळाले जीवदान. जय खिराडेच्या प्रसंगावधानाचे कौतुक

 मानोरा :-- तालुक्यातील  शेंदुरजना अढाव या गावातील  चिमुकल्या मुलाने प्रसंगावधान राखल्याने बुडत असलेल्या दोन मुलांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
  आरुष राहुल गवई (वय ११ वर्ष) सार्थक प्रमोद पडघान (वय वर्षे ११) आणि जय संतोष खिराडे (वय वर्षे ९) हे तिघेही गावातील आजे बुवांच्या ठिकाणच्या जवळ असलेल्या  बंधाऱ्यात पोहायला गेले असता आरुष राहुल गवई व सार्थक प्रमोद पडघान या दोघांनीही  बंधाऱ्यात उडी मारली दोघांनाही पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्यात बुडत असल्याचे जय संतोष खिराडे यांच्या लक्षात  येताच त्याने आरडाओरडा करत मदतीसाठी गावाकडे धाव घेतली.
प्रसंगावधान राखून गावातील लोकांना सांगितले की आरुष व सार्थक हे दोघे बंधाऱ्यात बुडत आहे अशी माहिती गावातील लोकांना सांगताच गावातील महिला व पुरुषांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.
  गावातील देवानंद यांनी आरुष व सार्थक या दोघांनाही पाण्याबाहेर काढले आरुष व सार्थक यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने ते दोघेही बेशुद्ध पडले होते त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे  रेफर केले.
पाण्यात बुडालेल्यांवर वाशिम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून दोघांनाही सुटी देण्यात आली आहे.
जय संतोष खिराडे यांनी हिम्मत करून गावकऱ्यांना घडलेली घटना सांगितली आणि दोन मुलांचे प्राण वाचवले त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment

फॉलोअर