दिग्रस. (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
*2025 ला शेती व्यवसाय करण्याकरिता शेकडो शेतकऱ्यांनी 2024 चे कर्जाचे पैसे भरले परंतु ग्राम विकास सहकारी संस्थेच्या सचिवाने शेतकरी यांना पावत्या दिल्या परंतु बँकेकडे पैसे भरलेच नाही त्यामुळे सचिवाच्या करामतीने शेतकरी यांना 2025 करीता कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी यांनी तक्रार केली आहे.
दिग्रस तालुक्यातील आमला,वाईमेंढी यासह 10 गावच्या सोसायटीच्या लक्ष्मण वामनराव डाखोरे यांच्याकडे शेकडो शेतकऱयांनी कर्जाची रक्कम भरली त्याच्या पावती सुद्धा सचिवाने दिल्या परंतु शेतकऱ्याचे पैसे बँकेकडे भरलेच नाही त्यामुळे 2025 मध्ये शेती करण्यासाठी कर्ज मिळालेच नाही,एप्रिल मधे मिळनारे कर्ज जुन महीना संपला तरी कर्ज मिळत नसल्याने शेतकरी यांनी आज दि 30 जुन रोजी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिग्रसचे व्यवस्थापक तसेच सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार केली.खाजगी सावकाराकडून कर्ज घेवुन आम्ही पेरणी केली जर का कर्ज मिळत नसेल तर आम्हाला आत्महत्त्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी यांनी म्हटले तर सचिव डाखोरे यांना निलंबीत करण्यात आले परंतु डाखोरे यांनी निलंबित झाल्यापासून नवीन सचिवास प्रभार दिला नाही त्यामुळे प्रशासनाने तीन ते चार दिवसात कारवाई करून शेतकरी यांना न्याय देण्याचे ठरविले आहे.
No comments:
Post a Comment