मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – आपल्या कारंजा मानोऱ्यातील मोहागव्हण गावचे सुपुत्र आणि सीमा सुरक्षा दलाचे (BSF) शूर जवान सुनिल सीताराम वाघमारे यांनी 'ऑपरेशन सिन्दूर' या महत्त्वाच्या लष्करी मोहिमेत धाडसी सहभाग घेत पाकिस्तानच्या लष्कराला सडेतोड उत्तर दिले. त्यांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानच्या लष्कराची माघार लागली असून, त्यांनी भारताच्या विजयी पताका लहरवत वाशीम जिल्ह्याचे व आपल्या भूमीचे नाव उज्वल केले आहे.
या शौर्यगाथेचा गौरव करण्यासाठी सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी माणोरा येथे भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हे स्वागत सोहळेाचे केंद्र बस स्टँड, मानोरा येथे राहणार असून, देशभक्त नागरिकांची उपस्थिती अत्यावश्यक आणि सन्माननीय मानली जाणार आहे.
संपूर्ण मानोरा व कारंजा परिसरातील ग्रामस्थांनी या गौरव सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या वीर जवानाचे अभिनंदन करावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment