Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, June 14, 2025

महावितरणच्या युध्दस्तरावरील प्रयत्नामुळे वीज पुरवठा पुर्ववत करण्यास महावितरणला यश. नैसर्गिक आपत्तीत खंडित झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यास सर्वोच्च प्राधान्य. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने तुटल्या होत्या वीज वाहिन्या आणि वीज खांब



यवतमाळ,दि.१४ जून २०२५; (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
         पांढरकवढा परिसरात नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करून यश मिळवले आहे. जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज वाहिन्या आणि वीज खांब तुटले होते. परिणामी संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता.अशी माहिती कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे यांनी दिली आहे.
        
          आपल्या घरातील वीज बटन दाबल्याबरोबर सुरू होतो.तथापि ही वीज ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी महावितरणच्या वीज वाहिन्यांचा शेकडो किलोमीटर प्रवास झालेला असतो.त्यामुळे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वाहिन्या क्षतीग्रस्त होतात,तसेच अनेक वीज खांब जमीन दोस्त होतात आणि वीज पुरवठा खंडित होतो.

         महावितरणच्या ३३ केव्ही पारवा उपकेंद्राला आपत्कालिन परिस्थितीत एक वाहिनी बंद पडली तर दुसऱ्या वाहिनीव्दारे वीज पुरवठा करता यावा म्हणून १३२ केव्ही घांटजी आणि १३२ केव्ही पांढरकवढा दोन अतीउच्चदाब उपकेंद्रातून ३३ केव्ही वाहिनीव्दारे वीज पुरवठा करण्यात आला आहे.परंतू मंगळवारी (दि.१० जून) झालेल्या वादळामुळे पारवा उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या दोन्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे पडली होती.त्यामुळे ३३ केव्हा पारवा उपकेंदेराचा वीज पुरवठाच बंद झाल्याने या उपकेंद्रावरील ३८ गावाचा वीज पुरवठा बंद पडला होता.

       तसेच या वादळामुळे ३३ केव्ही पारवा उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वीज वाहिन्या आणि लघूदाब वाहिन्यांवरही अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली होती. महावितरणचे अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत नुकसानग्रस्त वीज संरचना दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. प्रथम ३३ केव्ही पारवा उपकेंद्र सुरू करण्यासाठी ३३ केव्ही वीज वाहिन्यांवरील झाडे हटवणे, तुटलेल्या वाहिन्या आणि खांबांचे पुनर्स्थापन करणे, तसेच वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी लागणारे सर्व तांत्रिक उपाय अवलंबण्यात आल्यानंतर दुसर्या दिवशी (दि.११ जून) ३:४० वाजता ३३ केव्ही पारवा उपकेंद्र आणि पारवा गावातील चार रोहित्रे सुरू करण्यात आली.त्यानंतर १२ जूनला  ११ केव्ही पारवा ,११ केव्ही कुर्ली या वाहिनीवरील पूर्ण २० गावांचा (पारवा, सोनखास, लिंगापूर, डोर्ली, देवधरी, नागेझरी, चिंचोली, कोपरी, एरंडगाव,तरोडा, कुर्ली, राजापेठ, नारायणपेठ, चिखलवर्धा, अहिल्यानगर, गोविंदपूर, ताडसावली, खडका आणि  सैयाफळ )आणि ११ केव्ही जांब गावठाण वाहिनीवरील एकूण  ५ गावाचा (टिपेश्वर, वाढोणा, मेजदा, वघरा आणि रामनगर )आणि १३ जूनला जांब वाहिनीवरील उर्वरित १३ गावाचा (पार्डी, किन्ही, जांब,कालेश्वर, माथानी, सावंगी, मंगी, सावरगाव, धामणधरी,भीमकुंड,  सगदा आणि ठाणेगाव ) विद्युत पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले.
         वीज वाहिव्यावर झाडे़ पडल्याने मारेगाव तालुक्यात ३३ केव्हीचे १८ खांब,११ केव्हीचे ५२ वीज खांब आणि लघूदाब वाहिनीचे ३४ वीज खांब पडल्यामुळे खंडित झालेला बुरांडा, चिंचाळा ,नेत, वरुड ,अक्कापूर , मांगळूर , हिवरी, अर्जुनी , वेगाव, हिवरामांजरा, कुंभा, गौंड-बुरांडा, मचीन्द्रा , गाडेगाव , चिंच्मंडळ ,आपटी , मार्डी  यावाचा वीज पपवठा महावितरणच्या युध्दस्तरावरील प्रयत्नामुळे पूर्ववत करण्याला यश मिळाले आहे.

        वणी आणि झरी तालुक्यातही वादळ वाऱ्याचा मोठा फटका महावितरणला बसला आहे. ३३ केव्ही चे २ ,तसेच ११ केव्हीचे ३२ आणि लघूदाब वाहिनीचे ४४ वीज खांब आणि शेकडो किलोमिटर वाहिन्या तुटल्यामुळे खंडित झालेला मुकुटबन वितरण केंद्र अंतर्गत कायर, महाकालपूर ,वडजापूर,पिंपरी, सयदाबाद,चीलइ,आम्लोन,तेजापुर, येडद ,रामपूर , अडेगाव,कोसारा ,डोंगरगाव ,पठारपूर ,सिंधीवाढओना,मुकुटबन,अडकोलि,मारकी ,लहान पांढरकवडा,अर्धवन,राजूर ,  बैलमपूर हिरापूर ,खातेरा गाडेघाटचा वीज पुरवठा महावितरमच्या रात्र -दिवस सुरू असलेल्या युध्दस्तरावरील प्रयत्नामुळे पुर्ववत झाले आहे.

      मुख्य अभियंता अशोक साळुंके  यांचा महावितरणच्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून आपात्कालिन नैसर्गिक परिस्थितीत खंडित झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.विजेपुढे चुकीला माफी नाही त्यामुळे या काळात वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर