मानोरा :-- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस). शहर व तालुक्यात हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन महानायकांना अभिवादन करण्यात आले.
वाईगौळ (अमरगड) येथे हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक चौक येथील नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.नाईक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी वसंतराव नाईक मित्र मंडळ व श्रीनाथ ऑनलाईन वर्कक्सच्या वतीने मोफत बालरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये सुमारे १७६ बालकाची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले यावेळी दिग्रसचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अर्जुन जाधव यांनी बालकांची तपासणी केली.
सदर कार्यक्रमाला वाईगौळ येथील प्रतिष्ठित नागरिक गोविंद राठोड,दशरथ राठोड,जयसिंग राठोड,मारोती राठोड,श्याम राठोड,दिलीप जाधव,सुरेश जाधव,अरविंद राठोड,संजय पवार,हेमराज राठोड,निलेश पवार,साहेबराव राठोड,बंटी राठोड व वसंतराव नाईक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन गोपाल राठोड यांनी केले.
No comments:
Post a Comment