Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, July 1, 2025

वसंतराव नाईक जयंती कार्यक्रम- -यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती केले पाहिजे- संगीताताई राठोड

 (छत्रपती संभाजीनगर) (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी योग्य वेळी ध्येय निश्चिती करणे महत्त्वाचे असून यशाचा मार्ग संघर्षातून जातो असे प्रतिपादन संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी मा.संगीताताई राठोड यांनी केले. हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची १३३ वी जयंती व वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगरचा वर्धापन दिनानिमित्ताने वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित कार्यक्रममात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. श्रीमती राठोड पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयात शिकतांनाच आपले टार्गेट ठरवून पुढे जावे असे मत व्यक्त करून यावेळी त्यांनी नाईक साहेबांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय करून दिला. याप्रसंगी चेतनजी राऊत यांनी नाईक साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत लक्षणीय योगदान असल्याचे नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी नाईक साहेबांच्या कार्यकाळातील महत्वाच्या योजना, घटनांचा दाखला देत वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापने मागील भूमिका स्पष्ट करून आजच्या काळात नाईक साहेबांनी सुरू केलेल्या योजना त्यांचे संदर्भ कसे लागू पडतात हे उलगडून सांगितले. संस्थेचे सचिव नितीनजी राठोड यांनी आजचा विद्यार्थी यांच्या ऋणानुबंधाचे जतन करतांना शैक्षणिक उंची व स्तर वाढवत ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.टी.राठोड यांनी नाईकसाहेबासोबत व्यतीत केलेल्या क्षणांना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. वसंत हरकळ यांनी मानले. या कार्यक्रमास प्रबंधक श्रीमती सीमा वडते सर्वश्री एस.एम. राठोड, हिरासिंग जाधव बी.यू. राठोड ,गुलाब चव्हाण, रोहिदास जाधव, मनीष अग्रवाल ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर व समाजातील प्रतिष्ठित नागरिक तसेच वसंतराव नाईक महाविद्यालयव, बळीराम पाटील विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर