Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, July 23, 2025

खा.संजय देशमुख यांची दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक


दि.२२जुलै,2025 (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. संजय देशमुख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.अश्विनी वैष्णव  यांची  भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील दीर्घकालीन प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा केली. याही आधी खा.संजय देशमुख यांनी या विषयाला घेऊन संबंधित विषयाबाबत चर्चा केली होती. सदर विषयाचा पाठपुरावा करत परत त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. 

*मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा नेरोगेज ब्रॉडगेज प्रकल्पाला गती मिळणार*

खासदार देशमुख यांची सातत्याने मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठीची मागणी होती. या मार्गाचे DPR देखील बनवायचे काम त्यांनी पाठपुरावा करून सुरू करून घेतले. या सुरू असलेल्या DPR (Detailed Project Report) बद्दल यावेळेस चर्चा केली. हा DPR अंतिम टप्प्यात आला असून, पूर्ण होताच तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या मार्गावर एकेकाळी चालणारी ‘शकुंतला एक्सप्रेस’ पुन्हा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

*नांदेड व्हाया वाशिम–मुंबई रेल्वे लवकरच सुरू करण्याची मागणी !*

ट्रेन क्र. 17665/66 आणि 17667/68 (नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस) ही रेल्वे वाशिम मार्गे मुंबईसाठी मंजूर असूनही अद्याप सुरू झालेली नाही.खासदार देशमुख यांनी ही ट्रेन तातडीने सुरू करण्यात यावी,अशी मागणी केली होती काल झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री.सतीश कुमारजी यांनी ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

*_आता वाशिम जिल्ह्याला प्रथमच मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे मिळणार आहे,वाशिम जिल्ह्यातील जनतेचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे._*

तसेच यावेळी खासदार संजय देशमुख यांनी वर्धा–यवतमाळ -नांदेड या रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची गंभीर बाब चेअरमन यांच्या निदर्शनास आणून दिली.हा लोहमार्ग यवतमाळ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या कामास गती देणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली. रेल्वे बोर्डाने या मार्गाचे सघन निरीक्षण करून काम वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी,अशी विनंती त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

फॉलोअर