वाशिम ,दि. २३ जुलै (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना बँकिंग सेवांमध्ये समाविष्ट करणे आणि केंद्र शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देणे हा आहे.
नागरिकांनी जनधन खाते उघडून, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच अटल पेन्शन योजनांचा लाभ घ्यावा. हे सर्व लाभ घेण्यासाठी जनतेने बँक खात्याशी आधार लिंक करून, मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व बँका, पोस्ट कार्यालये, ग्राहक सेवा केंद्रांचे प्रतिनिधी आणि विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. शासकीय योजनांचा लाभ थेट गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्वजण एकत्रितपणे काम करणार आहेत.
श्री .यशवीर यांनी मोहिमेचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नेमून दिलेल्या ठिकाणी उभारण्यात येणार असून नागरिकांना माहिती, मार्गदर्शन आणि सेवा देण्यात येणार आहे.प्रत्येक बँकेला विशिष्ट गाव
नेमून देण्यात आले असून, त्या ठिकाणी
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शिबिरे
आयोजित करण्यात येणार आहेत.
यासाठी ग्रामसेवक, तलाठी व ग्राहक
सेवा केंद्रांचे सहकार्य घेतले जाईल.
नागरिकांनी अधिक माहितीसाठी
जवळच्या बँक शाखेशी किंवा जिल्हा
अग्रणी बँक कार्यालयाशी संपर्क
साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी सांगितले की, ही मोहीम नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, शासकीय योजना गरजूंना मिळाव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment