दिग्रस: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक केतन रत्नपारखी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले. त्याची तेरवी दि. 28 जून रोजी होती. ही तेरावी न करता तेरवीच्या खर्चात गौरक्षण आणि वृद्धाश्रमात केतनच्या नावाने दान देऊन रत्नपारखी परिवाराने स्तुत्य उपक्रम राबविला.
नेहमी गोरगरीब, दुखी- कष्टी, रुग्ण, वृद्ध व रंजल्या गांजल्याच्या सेवेत तत्पर असलेले माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते स्व. केतन रत्नपारखी यांचा वारसा पुढे चालवत त्यांच्या परिवाराने त्यांच्या तेरवीचा नेम टाळून दोला महाराज वृद्धाश्रम, उमरी पठार येथील वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदान केले. गौसेवक म्हणूनही स्व.केतन रत्नपारखी यांची ख्याती होती. त्याची गो सेवा पुढे चालावी यासाठी गौरक्षण येथे सुद्धा गोमातेला ढेप, चारा दान केले. यावेळी केतनच्या परिवारातील सर्व सदस्य तसेच आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment