Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, July 2, 2025

पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. नगारा म्युझियमचा सर्वांसाठी खुले करावे – मंत्री संजय राठोड


मुंबई, २(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
पोहरादेवी  येथे उभारण्यात येत असलेले संत सेवालाल महाराज यांचे मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच  श्री. क्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा म्युझियमचा लोकार्पण झाले असून सर्वांसाठी खुले करावे असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात  आयोजित  बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, वाशिमचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वित्त व नियोजन विभाग ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री राठोड म्हणाले,बंजारा समाजाची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज हे लाखो अनुयायांचे आराध्य दैवत आहेत. पोहरा देवी येथे उभारण्यात येणारे मंदिर आणि म्युझियम हे भाविकांसाठी आस्था केंद्र बनणार आहे. 

या कामासाठी आवश्यक निधी वित्त विभागाकडून लवकरच उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करून काम वेगात सुरू ठेवावे. ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे बंधनकारक असून गुणवत्तापुर्ण व दर्जेदार काम करावे असे श्री राठोड यांनी सांगितले.

या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
००००००००००

No comments:

Post a Comment

फॉलोअर