Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, July 3, 2025

धोकादायक ठरत असलेल्या कारखेडा वरोली रस्त्याच्या डागडुजीस अखेर प्रारंभ. वेळोवेळी प्रकाशित झालेल्या वृत्तांची व जनरेट्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.


मानोरा :--- तालुक्यातील विठोली कारखेडा वरोली हा रस्ता प्रचंड खड्ड्यांमुळे चाळण होऊन अपघातास आमंत्रण देणारा ठरला होता त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये रस्त्याचे कुठे अस्तित्वच ऊरले नसल्याने हा रस्ता चिखलमय होऊन रस्त्याने ये जा करणे धोकादायक झाल्याचे वृत्त तालुक्यातील सर्व वर्तमानपत्रांनी सातत्याने प्रकाशित केले होते त्याचे व काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याची दखल सा. बां. विभागाने घेऊन दोन दिवसात रस्ता वापरण्याजोगा करून देण्यात येणार असल्याचे पत्र निर्गमित करून कारखेडा वरोली रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ केलेला आहे.
 विठोली कारखेडा वरोली हा रस्ता यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला जोडणारा अंतर्गत ग्रामीण रस्ता असून रस्त्याची दैनावस्था मागील अनेक वर्षांपासून झालेली असल्यामुळे विठोली, रामतीर्थ, यशवंत नगर, कार्ली,कारखेडा, वरोली, सेवादास नगर, हरसुल आदी गावातील नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठे हाल सहन करावे लागत असल्याचे लक्षात घेऊन शासनाकडून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते. मंजूर काम ज्या कंत्राटदार कंपनीने सुरू केले होते ते मध्येच बंद पडल्याने उपरोक्त गावातील नागरिकांची मोठी परवड होत असल्याची दखल विविध वृत्तपत्रांनी अनेकदा घेतली होती. 
रखडलेला रस्ता तातडीने करण्यात येण्यासंदर्भात तालुक्यातील काही नागरिकांनी रस्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.
 वृत्तपत्रांनी प्रकाशित केलेले अनेक वेळचे वृत्तांकने व नागरिकांचा रेटा लक्षात घेऊन सा. बां. विभाग प्रशासनाने रस्ता दोन दिवसात वापरण्यायोग्य करून देण्याचे पत्र निर्गमित केले आहे व कारखेडा वरोली रस्ता कामास प्रारंभ केला आहे.


No comments:

Post a Comment

फॉलोअर