वाशिम,दि.३० जुलै (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) भारतीय डाक विभागाच्या इतिहासात नव्या युगाचा आरंभ होत आहे. काळाच्या ओघातही विश्वासाने चालत आलेल्या पोस्टाच्या सेवेने आता आधुनिकतेकडे झेप घेतली आहे. आयटी २.० या परिवर्तनशील उपक्रमांतर्गत, एपीटी अप्लीकेशन या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालयांमध्ये ४ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होत आहे.
ही केवळ प्रणाली नव्हे, तर ग्राहकांशी असलेल्या नात्याचा आधुनिक पुन्हा धागा आहे. पारंपरिक टपाल व्यवस्थेपासून आजच्या डिजिटल युगात प्रवेश करत, सेवा आणखी जलद, अचूक आणि पारदर्शक होणार आहेत.
मात्र या बदलासाठी २ ऑगस्ट रोजी सर्व व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. ही तात्पुरती गैरसोय पण उज्वल उद्याची नांदी आहे.
डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या काळात राख्यांचे टपाल वेळेत पोहोचावे म्हणून अंमलबजावणीची तारीख ५ ऑगस्ट ऐवजी ४ ऑगस्ट करण्यात आली आहे.
ही योजना म्हणजे एका परंपरेचा आधुनिक स्पर्श आहे
जुन्या पाकिटात नवीन आशय,
ज्यामुळे दूरवरच्या नात्यांनाही डिजिटल वेग लाभणार आहे.असे डाक विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment