यवतमाळ, दि.०६ जुलै २०२५ : (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
वीज सेवेशी संबंधित ग्राहकांच्या विविध तक्रारी एैकून घेत त्या तक्रारी सोडविण्यासोबत वीज सेवा अधिक पारदर्शक, उत्तरदायी व लोकाभिमुख करण्यासाठी महावितरणचा पहिला "ऊर्जामित्र दिन' मंगळवार दिनांक ८ जुलै २०२५ ला पार पडणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टिने उपविभाग निहाय आयोजित या "ऊर्जामित्र दिनात” जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.
लोकशाही दिनाच्या धर्तीवर आयोजित महावितरणचे "ऊर्जामित्र दिन" प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महावितरणच्या सर्व उपविभागांमध्ये उपकार्यकारी अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. या दिवशी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थेट ग्राहकांशी संवाद होईल, वीज पुरवठ्याशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारी, सूचना , अपेक्षा आणि अभिप्राय स्विकारल्या जाईल आणि ते निवारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
जिल्ह्यात महावितरणचे १८ उपविभाग आहेत. या उपक्रमाच्या आयोजनात ग्राहकांची सोय बघतल्या गेली असून "ऊर्जामित्र दिनाचे " आयोजन त्या दिवसी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान १८ उपविभागीय कार्यालयात करण्यात येणार आहे. तथापि प्राप्त सर्व तक्रारी एैकून घेत त्या तक्रारीची दखल घेतल्या जाणार आहे.
ऊर्जामित्र दिनामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संवाद अधिक खुला व विश्वासार्ह होईल, तसेच सेवा सुधारण्यास हातभार लागेल. उपक्रमाची अमंलबजावणी यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी, वीज ग्राहक यांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असून "ऊर्जामित्र दिन "ही एक अभिनव संकल्पना ठरणार आहे.
No comments:
Post a Comment