वाशिम-(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार श्याम खोडे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चार लाख रुपयांचा धनादेश स्नेह भेट म्हणून सुपूर्त केला.
आमदारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मतदारसंघात विविध विकासकामांचा झंझावात आणणारे व उपमुख्यमंत्र्यांकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार श्यामभाऊ खोडे यांनी, फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतील विविध उपक्रम राबवले.
मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चार लाख रुपयांचा धनादेश मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करत, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी फडणवीस साहेबांनी आमदार खोडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
No comments:
Post a Comment