Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 1, 2025

वाशिम जिल्ह्याच्या ग्रंथालय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब!बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार


मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):
वाशिम जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रात आज अभिमानाचा क्षण आला आहे. मानोरा तालुक्यातील बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी या ग्रामीण भागातील ‘क’ वर्गातील वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार (ग्रामीण - क वर्ग) आजच जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार वाशिम जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक ग्रंथालयाला आजवर असा पुरस्कार मिळालेला नव्हता. त्यामुळे बलराम वाचनालयाने हा मान पटकावून जिल्ह्याच्या ग्रंथालय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे.

या वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. धनंजय राठोड यांचे ग्रंथालय चळवळीत मोठे योगदान आहे. जिल्हा ग्रंथालय संघाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शासनाचे ग्रंथोत्सव कार्यक्रम, कार्यशाळा यामध्ये ते नेहमी पुढाकार घेतात. त्यांची कार्यशक्ती आणि सर्वसामान्यांशी जोडलेली सहकार्याची भावना ही त्यांच्या नेतृत्वाची खासीयत आहे.

या पुरस्कारामुळे फुलउमरीसारख्या ग्रामीण भागातील वाचनालयास नवे बळ मिळाले आहे. वाशिम जिल्हा ग्रंथालय संघ तसेच अमरावती विभाग ग्रंथालय संघातर्फे डॉ. धनंजय राठोड, वाचनालयाचे संपूर्ण कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर