Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, August 2, 2025

मानोरा शहरात निर्भया पथक स्थापन करण्याची मागणी — व्यापारी संघटनेचे निवेदन


मानोरा (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) : मानोरा शहरातील विविध शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी "निर्भया पथक" स्थापन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी व्यापारी संघटना मानोरा तर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात व्यापारी संघटनेने आज मानोरा पोलीस स्टेशनला भेट देऊन ठाणेदार नयनाजी पोहेंकर यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, मानोरा शहरात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, एस.पी.एम. हायस्कूल, इंदिरा गांधी कन्या हायस्कूल, वसंतराव नाईक हायस्कूल, रहेमानिया उर्दू हायस्कूल, सुलेमानिया उर्दू हायस्कूल, चिंतामणी शाळा, जिल्हा परिषद शाळा, तसेच कॉन्व्हेंट शाळा, कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रे, बसस्थानक परिसर या ठिकाणी मुली व महिलांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे या ठिकाणी निर्भया पथकाच्या नियमित गस्तीची नितांत आवश्यकता आहे.

या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावेळी श्री. राजू गुल्हाने (अध्यक्ष, व्यापारी संघटना मानोरा), श्री. श्याम हेडा (उपाध्यक्ष), कादर सेठ लंघा (सचिव), श्री. राजेंद्र दीक्षित (सहसचिव), श्री. पप्पू सेठ हेडा, श्री. रावसाहेब देशमुख, आणि श्री. अरुणसेठ हेडा हे सर्व सदस्य उपस्थित होते.

व्यापारी संघटनेने यावेळी पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर निर्भया पथक स्थापन करून शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी सकारात्मक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

फॉलोअर