Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, August 10, 2025

मंगळवारला पार पडणार महावितरणचा दुसरा. "ऊर्जामित्र दिन" वीज ग्राहकाच्या तक्रारीचे होणार निराकरण. सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन



यवतमाळ,दि.१० ऑगष्ट २०२५;( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
        वीज ग्राहकांच्या वीज सेवेशी संबंधित तक्रारी सोडविण्यासाठी मंगळवार दिनांक १२ ऑगष्ट ला महावितरणच्या २३ उपविभागात "ऊर्जामित्र दिनाचे"आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान आयोजित या दिनाचा जिल्ह्यातील जास्तित जास्त वीज ग्राहकांनी लाभ घेवून आपल्या तक्रारीचे निराकरऩ करून घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

       लोकशाही दिनाच्या धर्तीवर आयोजित महावितरणचे "ऊर्जामित्र दिन" प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महावितरणच्या सर्व उपविभागांमध्ये उपकार्यकारी अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत  आयोजित केला जात आहे. या दिवशी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थेट ग्राहकांशी संवाद होईल, वीज पुरवठ्याशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारी, सूचना , अपेक्षा आणि अभिप्राय स्विकारल्या जाईल आणि ते निवारण्यासाठी  प्रयत्न केले जाणार आहे. तथापि प्रथम या अगोदर पार पडलेल्या ऊर्जामित्र दिनातील तक्रारींचा लेखाजोगा घेतल्या जाणार आहे.   

        परिमंडळात महावितरणचे ४१ उपविभाग आहेत.त्यापैकी अमरावती २३ आणि यवतमाळ जिल्ह्यात १८ उपविभाग आहेत. या उपक्रमाच्या आयोजनात ग्राहकांची सोय बघतल्या गेली असून "ऊर्जामित्र दिनाचे " आयोजन त्या दिवसी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान ४१ उपविभागीय कार्यालयात करण्यात येणार आहे. तथापि प्राप्त सर्व तक्रारी एैकून घेत त्या तक्रारीची दखल घेतल्या जाणार आहे. 

       ऊर्जामित्र दिनामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संवाद अधिक खुला व विश्वासार्ह होईल, तसेच सेवा सुधारण्यास हातभार लागेल. उपक्रमाची अमंलबजावणी यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी, वीज ग्राहक  यांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असून "ऊर्जामित्र दिन "ही एक अभिनव संकल्पना ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर