Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, August 13, 2025

वाशिममध्ये आज रानभाजी महोत्सव आणि विविध कृषी उपक्रमांचे भव्य आयोजन



वाशिम, दि. १२ ऑगस्ट (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्र (आत्मा), काटा रोड, वाशिम येथे आज दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ‘रानभाजी महोत्सव’ तसेच विविध कृषी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या उपक्रमामध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, वाशिम शेती शिल्प कृषी विपणन, सेंद्रीय शेती उत्पादन विक्री, डेअरी उत्पादन विक्री, वत्सगुल्म स्मार्ट पीक पेरणी स्पर्धा, तसेच PMFME अंतर्गत उत्पादन विक्री इत्यादींचा समावेश आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी व ग्राहक बांधवांनी रानभाजी महोत्सव तसेच विविध कृषी उपक्रमांच्या समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

फॉलोअर